मातीवरील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पै.कु.सृष्टी भोसले चे सुवर्णपदक

NIKAL WEB TEAM :
रघुकुल विद्यापीठ गोंडा उत्तरप्रदेश येथे झालेल्या मातीवरील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या पै.कु.सृष्टी भोसले ने 62 किलो महिला कुस्ती मध्ये सुवर्णपदक मिळवले.
क्वालिफिकेशन राउंड मध्ये तिने मध्यप्रदेश च्या पै.कु.शाहीन वरब15-0 असा विजय मिळवला.क्वार्टर मध्ये राजस्थान च्या मनीषा माळी वर 6-4 ने विजय मिळवला.सेमी मध्ये कर्नाटक च्या श्वेता वर 15-0 ने विजय मिळवत फायनल मध्ये हरियाणा च्या प्रीती वर 2-1 ने विजय मिळवत सुवर्णपदक मिळवले.
सृष्टी द्रोणगिरी कुस्ती संकुल राशिवडे कोल्हापूर येथे वस्ताद संदीप देवळकर व कृष्णात चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
युनायटेड वर्ल्ड रेसीलिंग संस्थेने पारंपारिक खेळांना मान्यता देऊन मातीतल्या कुस्तीतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी दोन वर्षापूर्वी जाहीर केल्यामुळे रेसीलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ने मातीतल्या नॅशनल स्पर्धा घेण्याची सुरवात केली ज्याचा फायदा मातीत सराव करणाऱ्या मल्लाना होणार आहे.
पै.कु.सृष्टी भोसले चे कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.