क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांचा चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार.

कागल प्रतिनिधी :

येथील श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक मल्लांनी राष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. यामध्ये कुस्तीगीर सृष्टी जयवंत भोसले,ऋतुजा राजेंद्र संकपाळ व सोहम सुनिल कुंभार यांचा समावेश आहे.

गोंडा उत्तरप्रदेश येथे झालेल्या सिनियर राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धा २०२१ मध्ये महिला कुस्तीगीर सृष्टी भोसले हि ६२ किलो वजन गटात कास्यपदकाची मानकरी ठरली. या अगोदर तिने सातारा येथे झालेल्या २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. तसेच बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची मानकरी ठरली होती.

कारखान्याची मानधनधारक दुसरी महिला कुस्तीगीर ऋतुजा संकपाळ हिने सातारा येथे झालेल्या २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ७२ किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले. तसेच इतर मानधनधारक कुमार कुस्तीगीर सोहम सुनिल कुंभार याने झारखंड येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ४१ किलो वजन गटात चटकदार कुस्त्या करून कास्यपदक पटकाविले. यापुर्वी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविले आहे.

या मल्लांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह राजे घाटगे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks