ताज्या बातम्यामहाराष्ट्र
भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात माजी सरपंचाच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू ; तर दोघे जण गंभीर

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापुर ,भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात माजी सरपंचाच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ संभाजी खोत (वय 21) असे मृत तरुणाचे नाव असून तो माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता मुलगा होता.
अधिक माहिती अशी की भुयेवाडी येथे आज दुपारपासून वारणा बाजार परिसरात गव्याचा वावर होता. हा गवा गेले चार दिवस कोल्हापूर शहरापासून आसपासच्या गावांमध्ये फिरत होता. भेदरलेल्या गव्याने आज भुयेवाडीतील सौरभ खोत आणि अन्य दोघांना धडक दिली.या धडकेत स्वरूप खोत हा जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या वर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर वनविभागाकडून भुयेवाडी सह परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.