मुरगुड बसस्थानक परिसरातील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे काम तात्काळ करा : नागरिकांची पालिका प्रशासनाकडे मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड शहरातील बसस्थानक परिसरातील जिल्हा परिषदेची मालकी असलेल्या मुख्यमार्गावरील दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे.अशी मागणी या परिसरातील गाळेधारकांनी व नागरीकांनी नगरपरिषदेकडे लेखी मागणीद्वारे केली आहे.
निवदेन असे ,नगरपरिषदेच्या इमारती समोरील शिवतीर्थ परिसराचे कांही दिवसांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले आहे.याच परिसरातून ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषदेच्या इमारतीच्या मध्यभागातून जिल्हा परिषदेच्या मालकीचा मुख्य मार्ग जातो या मार्गाचे डांबरीकरण गेल्यावर्षी केले आहे.पण या परिसरातील गाळेधारक व नागरिकांनी गेली काही वर्षे वारंवार मागणी करुन देखील त्याच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या करण्यात आलेल्या नाहीत.पालिका प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता असल्याचे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम केले आहे.रस्ता हा वर्दळीचा आहे.
त्यामुळे परिसरात नेहमी धुळीचे साम्राज्य असते.त्याचा त्रास शहरातील नागरिकासह संबंधित गाळेधारकांना दररोज सहन करावा लागत आहे.यासाठी सदर ठिकाणचे डांबरीकरण किंवा सिमेंटचे काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे.अशी मागणी आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संदीप घार्गे यांना शिष्टमंडळाने भेटून लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर राजेंद्र चव्हाण,पप्पू बारदेसकर नंदू खंडागळे, शिवाजी कुराडे, कुणाल क्षीरसागर,, सुभाष अनवकर, सागर भोसले,अनिल अनावकर, स्वप्निल शिंदे,आदित्य पाटील, मारुती जाधव, विक्रांत भोपळे आदींच्या सह्या आहेत.