ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर उपजिल्हा युवासेना अधिकारीपदी नितीन खराडे यांची नियुक्ती

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर ग्रामीण जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
यामध्ये कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील नितीन काकासाहेब खराडे यांची कोल्हापुर उपजिल्हा युवा अधीकारी पदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.