ताज्या बातम्यामहाराष्ट्र
LPG सिलिंडर आजपासून महाग, द्यावे लागणार 105 रुपये जास्त

टीम ऑनलाईन :
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा आता सामान्यांना बसू लागल्या आहेत. या युध्दाच्या दरम्यान आज 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले.
सिलिंडर 19 किलोचा LPG सिलेंडर दिल्लीत 1907 रुपयांऐवजी 2012 रुपयांना मिळणार आहे.
कोलकात्यात आता 1987 ऐवजी 2095 रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता 1857 रुपयांवरून 1963 रुपयांपर्यंत वाढली आहे.
घरगुती सिलिंडरचे दर 105 रुपयांनी वाढले आहेत.
व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली असून 7 मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलिंडरही महाग होण्याची शक्यता आहे.