बेळगाव येथे केवा टीम योद्धा मार्फत गुणगौरव सोहळा

बेळगाव प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
बेळगाव येथील फौंड्री क्लस्टरमध्ये केवा कायपो इंडस्ट्रीज च्या टीम योद्धा मार्फत प्रमोशन झालेल्या लोकांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. नितीनजी घोईल होते.
सामान्य लोकांना सुरक्षित उत्पन्नाचा मार्ग केवा कायपो कम्पनीद्वारे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे टीम योद्धा मार्फत सर्वांकडे आलेली संधी आहे ती दवडू नका. ज्यांना आपले करियर करायचे आहे, अशा सर्वांनी टीम योद्धा च्या संस्थापिका कल्पना शेट्टी मॅडम यांच्याशी संपर्क साधावा. स्वागत सौ कल्पना शेट्टी यांनी केले तर प्रस्ताविकातून कम्पणीचा बिजनेस प्लॅन संभाजी पाटील यांनी सांगितला.
यानंतर चेअरमन डॉ नितीनजी घोईल व विठोबा चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर व प्रमोशनल व्यक्तींना मार्गदर्शन केले केवा कडे जॉईन व्हा व आपले करिअर साधा असे सांगितले.
यावेळी फ्रँचायसीज,होम शॉपी ,दुचाकी विजेते,तसेच विविध पदावर पोचलेल्या व्यक्तींचा सत्कार सम्पन्न झाला यावेळी दीपाली सावन्त,रंजन सावंत,रोहिदास पवार,नंदू कुंभार,गीता सुतार,सीताराम गुरव,आदींनी व्यसायाबद्दल प्रगती कशी केली ते मनोगत व्यक्त केले यावेळी अर्चना पाटील,शैलेश नायडू,महेश सामंत,भरमा गडकरी,कांचन वाके,स्वप्नाली अपटेकर,श्रीकांत हलगेकर,पदमजा सामंत,राजेंद्र सामंत आदींसह मान्यवर उपस्थित होते.