कुडूत्रीतील वीज ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलला : निकाल न्यूज व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश : बाजीराव पार्टे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घेतले परिश्रम

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कुडूत्री (ता. राधानगरी ) येथील गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या विहिरीजवळील ट्रान्सफॉर्मर निकामी झाला होता.या बाबत निकाल न्युजने विज वीतरण राधानगरी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला होता.कनिष्ठ अभियंता राहुल काळे यांनी लवकरात लवकर निकामी ट्रान्सफॉर्म बदलण्यात येईल असे आश्वासन निकाल न्युजच्या प्रतिनिधीस दिले होते.त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेले दोन दिवस गावचा नळपाणी पुरवठा बंद होता.पाण्यासाठी महिलांचे हाल होऊ नये यासाठी वीज वितरण कर्मचारी बाजीराव पार्टे आणि त्यांचे इतर कर्मचारी यांनी दुसऱ्या ट्रान्सफॉर्मवरील वीज पुरवठा देऊन झाडाझडती घेत विद्युत पंपाला वीज पुरवठा केल्याने तात्पुरता का असेना पाणी पुरवठा सुरू केला होता.याबद्दल वीज कर्मचाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने नळांना पाणी न आल्याने पाण्याविना सर्वांचेच हाल झाले.अनेक महिलांनी तसेच तरुणांनी गावातील विहीर आणि भोगावती नदीतून पाण्यासाठी पायपीट करत पाणी उपलब्ध केले तर अनेकांनी टँकर मागवून घेत पाणी उपलब्ध केले.
दरम्यान दोन दिवस वीज वितरण चे कर्मचारी आपल्याकडून वीज पुरवठा सुरळीत सुरू व्हावा यासाठी परिपूर्ण प्रयत्न करत होते. यामध्ये मुख्य बाजीराव पार्टे (वरीष्ठ तंत्र),यांच्यासह संतोष पाणारी, रवी रायकर, सरदार फकीर,प्रशांत निकम,विकास पाटील,नेताजी बेलदार,महादेव जाधव,युवराज पाटील आदींनी परिश्रम घेतले.