कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करु : उत्तम पाटील; कूपनलिकेचे पाणी पूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

कोगनोळी :
कोगनोळीवर आमचे विशेष प्रेम आहे त्यामुळे कोगनोळीतील समस्यांचे प्राधान्याने निराकरण करू, अशी ग्वाही अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. ते वार्ड क्रमांक एक मधील कूपनलिकेचे पाणी पूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरदेव यात्रा कमिटी अध्यक्ष बाबुराव कगुडे हे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जय किसान पिकेपीएसचे चेअरमन उमेश पाटील यांनी केले.
प्रारंभी कूपनलिकेचे पाणी श्री गणेशास अर्पण करून पाण्याचे पूजन उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तम पाटील पुढे म्हणाले माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सहकार्यातून निपाणी मतदार संघामध्ये प्राथमिक कृषी बत्तीन संघांना एक कोटी 58 लाख रुपयांची परत उपलब्ध करून देण्याचे मोठे काम केले आहे. त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शासकीय मदत पोहोचण्याआधीच अरिहंत उद्योग समूहाने गरजूंपर्यंत पोहोचून आधार देण्याचे काम केले आहे. कोगनोळीमध्ये अनेक विकासकामांच्या माध्यमातून आर्यन तू उद्योगसमूहाने 30 लाखांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. याप्रसंगी उत्तम पाटील यांनी कूपनलिका खोदून दिल्याबद्दल बाबुराव कगुडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सागर जाधव, मनीषा परीट, रामचंद्र कागले यांनी आपल्या मनोगतातून उत्तम पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी निपाणीचे माजी नगराध्यक्ष शिरीष कमते, प्रकाश गायकवाड, किरण चौगुले, अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, सदस्या शोभा मानगावे, पीकेपीएसचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, विठ्ठल कोळेकर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सचिन परीट यांनी आभार मानले.