ताज्या बातम्या
सिध्दनेर्ली परिसरातील वडगाव रस्त्याला बिबट्यासदृश्य प्राणी

सिध्दनेर्ली प्रतीनिधी : शिवाजी पाटील
सिध्दनेर्ली परिसरातील वडगाव वाटेला रात्री साडेअकरा वाजता वडगावच्या कांही तरूणांना बिबट्यासदृश्य प्राणी निदर्शनास आलेला आहे, त्याच्या पायाचे ठसे सिध्दनेर्ली येथील बाळु जत्राटे यांच्या रानात दिसत आहेत, त्यामुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे.

सध्या ऊनाची तिव्रता ज्यादा असलेने शेतीला पाणीपुरवठा करणारी वीज रात्रीच असते, तसेच या परिसरात पाणीपुरवठा संस्था असलेने रात्रीच पाणीपुरवठा होतो , तसेच या भागात फिरणेसाठी लोक मोठ्या प्रमाणात असतात त्यातच हा बिबट्यासदृश्य प्राणी व पायाचे ठसे आढळलेने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.