परिस्थती विपरित असली तरी परिस्थितीवर मात करायला शिका : किशोरकुमार खाडे

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ज्या गावची शाळा गुणवत्तेत मोठी असते तेच गांव खऱ्या अर्थाने समृध्द असते त्यामुळे परिस्थती विपरित असली तरी परिस्थितीवर मात करायला शिका ,असे प्रतिपादन मुरगुडचे पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे
यांनी केले.ते स्वराज्य निर्माण संस्थेच्या वाटचाल यशस्वी करीअरची व 10/12वी गुणवंत विद्यार्थी सन्मान सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन मा.प्रा.डॉ. प्रदिप कांबळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी संभाजी शिंत्रे तसेच विद्यार्थी मनोगत रेश्मा भाईगडे यांनी आपली मनोगते मांडली.
यावेळी 10 व 12 वी विद्यार्थी व पालक परशुराम गायकवाड, शिवाजी गायकवाड, दत्तात्रय भाईगडे, पांडुरंग गायकवाड ,तानाजी गायकवाड, शिवाजी भारमल बळीराम गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन आनंद गायकवाड, रोहित बोटे, वैभव आंगज,दिगंबर गायकवाड, साताप्पा पाटील,महेश वास्कर यांनी केले होते
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक स्वराज्य निर्माण संस्थापक संदिप बोटे यांनी केले सुत्रसंचालन विकास सावंत यांनी केले तर आभार क्रुष्णात कापसे मानले