ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेधशाळेच्या अंदाजानुसार 21 व 22 जुलैला ‘रेड अलर्ट’ ; नागरिकांना सावधानतेचा इशारा

‘Red Alert’ on July 21 and 22, according to observatory estimates; Warning to the citizens

कोल्हापुर, प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

कोल्हापुर दि. 20 : भारतीय हवामान वेधशाळेने 20 जुलै 2021 रोजी ऑरेंज अलर्ट, 21 व 22 जुलै 2021 या दिवसांकरिता रेड अलर्ट व 23 जुलै 2021 करिता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. या कालावधीमध्ये अति पाऊसमान ( प्रतिदिन 70 ते 150 मि.मी. किंवा त्याहून जास्त) होण्याची शक्यता आहे. विशेषत: जिल्हयातील चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंदाजित पाऊसमानानुसार नदी पात्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगराळ भागामध्ये भूस्खलन अथवा दरडी कोसळणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड होणे या सारख्या घटना संभावत असल्याने जिल्हयातील नागरीकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks