निढोरी येथे उद्या विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ खासदार संजय मंडलिक यांची उपस्थिती

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरी ता कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विविध फंडातून व खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर झालेल्या नळ पाणी पुरवठा [जलकुंभ)ब वर्ग तीर्थक्षेत्र व २५\१५ योजनेतून व १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या सुमारे साडे सात कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारंभ उद्या रविवारी २४ नोव्हेंबर रोजी निढोरी येथे होत असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून व देवानंद पाटील वाढदिवस गौरव समितीने दिली.
प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर प्रांगणात सायंकाळी ५:वाजता कार्यक्रम होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिद्री साखर कारखाण्याचे संचालक गणपतराव फराकटे आहेत. या वेळी गोकुळ संचालक नवीद मुश्रीफ देवानंद पाटील विकास पाटील बंटी सावंत सरपंच अमित पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी जि प सदस्य युवराज पाटील के डी सी सी संचालक भैया माने.प्रविणसिंह पाटील केशवराव पाटील अतुल जोशी प्रकाश गाडेकर रमेश तोडकर मनोज फराकटे शशिकांत खोत इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.