राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बसस्थानक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन

कागल प्रतिनिधी .
कागल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बसस्थानक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.स्वराज्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी झटणारे रयतेचे राजे कायमच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. आज त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांनी स्थापलेल्या या लोककल्याणकारी स्वराज्यात त्यांचे विचार आणि कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवून कार्य करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद प्रेरणादायी आहेत .अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने,राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव ,विशाल पाटील ,धैर्यशील इंगळे,असिफ मुल्ला,हिदायत नायकवडी,अरूण गुरव,दादू गुरव,बाळासो हेगडे श्रीकांत कोरवी आदी उपस्थित होते.