कुमार भवन, शेणगाव शाळेत ‘राष्ट्रीय गणित दिवस’ उत्साहात साजरा

गारगोटी :
श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी बी.एड्.अभ्यासक्रमांतर्गत शालेय आंतरवासिता टप्पा- 2 व कुमारभवन, शेणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेमध्ये ‘राष्ट्रीय गणित दिवस’ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के.एच्.कॉलेज, गारगोटीचे प्राध्यापक डॉ. सागर व्हनाळकर आणि प्राध्यापक डॉ. संताजी खोपडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुमारभवन, शेणगाव शाळेचे मुख्याध्यापक डॉ. एस्. बी. शिंदे होते. शालेय आंतरवासिता मार्गदर्शक आणि आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. पी.एस्.देसाई उपस्थित होत्या. कुमारभवन शेणगाव शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये प्राध्यापक डॉ. सागर व्हनाळकर यांनी गणित दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक डॉ.संताजी खोपडे यांनी गणित दिवसाची पार्श्वभूमी, श्रीनिवास रामानुजन यांची ओळख आणि विद्यार्थ्यांच्यात गणित विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठीचे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राध्यापक डॉ.एस्.बी.शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांना व इतरांना गणित दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मार्गदर्शक सहयोगी प्राध्यापिका डॉ. पी. एस्. देसाई यांनी गणित दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व, गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठीचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एड्. छात्रप्रशिक्षणार्थी अंकिता नलवडे यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमापूजनाने व भित्तीपत्रिका उद्घाटनाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख बी.एड्. छात्रप्रशिक्षणार्थी प्रियांका मगदूम यांनी केली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मान शाल व फुल देऊन केले. गणिताची आवड निर्माण व्हावी, यासाठी गणिती गाणे ऐकवण्यात आले. राष्ट्रीय गणित दिवसाचे अवचित्य साधून प्रशालेमध्ये द्वितीय सत्रात प्रश्नमंजुषाचे आयोजन केले.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली. आभार बी.एड्.छात्रप्रशिक्षणार्थी वनिता मगदूम यांनी केले.