पन्हाळा : नाझरे माध्यमिक विद्यालयाचे एन.एम.एम.एस परिक्षेत घवघवीत यश

कळे-वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील शिवपार्वती शिक्षण प्रसारक मंडळ वेतवडे संचलित स्वा.से एम.डी नाझरे माध्यमिक विद्यालय वेतवडे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023/ 24 मध्ये झालेल्या एन.एम.एम.एस परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
अनुक्रमे वैष्णवी दीपक दळवी,सुमित तानाजी दळवी ,वैष्णवी संभाजी पाटील,शितल बाळासो पाटील ,अनुष्का भागोजी पाटील,नम्रता भिकाजी पाटील,वैष्णवी रघुनाथ किरुळकर ,साधना तुकाराम पाटील, गायत्री संभाजी पाटील,सृष्टी बाबुराव पाटील,साक्षी वसंत पाटील,मृणाली सरदार दळवी,गणेश शिवाजी पवार,अथर्व शिवाजी पाटील ,तन्मय नितीन जाधव, ओमकार विनायक कांबळे, सतेज भगवान पाटील अशा एकूण १७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय माने ,उपाध्यक्ष डॉ.दिलीप माने, सचिव आनंदा देमजी चौगले, प्रभारी मुख्याध्यापक संजय पाटील,प्रज्ञा जाधव, दिलीप कांबळे, सुरेश पाटील, लिपिक नामदेव दळवी, शिक्षकेतर कर्मचारी नामदेव पाटील, आनंदा दळवी ,संजय गुरव शिवाजी गायकवाड या सर्वांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे.