कुडूत्रीत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वितरण अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम

कुडूत्री प्रतिनिधी :
कोरोनाचा वाढता धोका पाहता लोकांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीत वाढ व्हावी व कोरोनाशी मुकाबला करता यावा यासाठी अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो.संस्थेच्या वतीने नुकतेच कुडूत्री(ता.राधानगरी)येथे आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वितरण ग्रामस्थाना करण्यात आले.
दरवर्षी समाज केंद्र बिंदू डोळ्यासमोर ठेवून अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था वेगवेगळे उपक्रम दर महिन्याला राबवत असते. व लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करत असते.आज पर्यंत संस्थेने ज्या ज्या वेळी मानवावर संकटे आली. त्या त्या वेळी संस्थने लोकांच्या साठी पुढाकार घेतलेला आहे.हे काम गेले १३ वर्षे अखंडपणे जोपासले आहे. व राज्यात आपला नावलौकिक मिळवला आहे.
या आर्सेनिक गोळ्यांचे वितरण कोरोना दक्षता समिती चे सदस्य व पोलीस पाटील,संतोष पारकर, रामचंद्र पाटील,प्रकाश चौगले,भिमराव मोहिते,राम घुगरे,शिवाजी चौगले,जयसिंग चौगले,रोहित पारकर,महेश चौगले,सुरेश सुतार यांच्या हस्ते ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
या कामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव, डॉ. दिपा कुष्टे, डॉ.नंदिनी गावडे, डॉ.अश्विनी खोराटे, डॉ.माधुरी खोत,अरुणा पाटील,आदींच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.या वेळी पत्रकार सागर लोहार (साके), व अनंतशांतीचे राधानगरी – भुदरगड संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौगले आदी उपस्थित होते.