शरद पवार पित्ताशयाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल ; 31 मार्चला होणार शस्त्रक्रिया

टीम ऑनलाईन :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली आहे. दरम्यान, याबाबत सुप्रिया सुळे यांनी व्हाॅट्स ॲप स्टेटसद्वारे माहिती दिली आहे.
३१ मार्च रोजी बाबा हॉस्पिटलमध्ये १० दिवसांसाठी दाखल होतील, त्यांनतर घरी विश्रांती घेतील, त्यांचे दौरे आणि कार्यक्रम दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी व्हाॅट्सअप स्टेटस द्वारे दिली आहे.
रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. यामुळे शरद पवार यांना ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यांच्यावर एन्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल. यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.