महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यात क्रांतिगुरू लहुजी साळवेंचा सिंहाचा वाटा : निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर आर पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर प्रतिनिधी :
शिवाजी पेठेतील, शिवाजी तरुण मंडळा मध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर आर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सिध्दांत हाॅस्पिटलचे डॉ.कौस्तुभ वाईकर,शिरोलीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे,एक्साईजचे पोलीस निरीक्षक संभाजी बर्गे,मुख्य औषध निर्माण अधिकारी वैशाली जाधव,राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सूर्यवंशी,संघर्षनायक बहुजन मिशनचे संस्थापक संतोष आठवले, दलितमित्र बळवंतराव माने,कामगार नेते नामदेव नागटिळे,आरोग्यसेवक अमोल इसापुरे,महाराष्ट्राचे हलगी सम्राट युवराज गायकवाड,जीवन आधार संस्थेचे संस्थापक शंकर पोवार आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी गोकुळचे संचालक चेतन नरके,आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ञ डॉ.सतीश पत्की, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण,अजितदादा चव्हाण,ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.दत्ताजीराव कवाळे,रिपाई चे कायदेशीर सल्लागार अॅड.राहुल सडोलीकर,अॅड.सचिन आवळे, अॅड.प्रमोद दाभाडे,परिवतर्तन फौंडेशनचे अमोल कुरणे,लहुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,ऋषिकेश दिवटे,सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर शशांक आसंगावकर, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.