महिंद्रा कंपनीचे भात बियाणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे : सुरेश चौगले

कुडूत्री(प्रतिनिधी)
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. तरी सुद्धा येथे पावसाचे प्रमाण चांगले असल्याने भात पिक चांगले येते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून महिंद्रा कंपनीने तयार केलेले भात बियाणे उत्कृष्ट असून भरीव उत्पन्नासाठी हे पिक फायदेशीर असल्याचे मत महिंद्रा कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर सुरेश चौगले यांनी कुडूत्री(ता.राधानगरी) येथे भात पिक पाहणी कार्यक्रम प्रसंगी केले.
कुडूत्री (ता. राधानगरी) येथील प्रगतशील शेतकरी अरविंद पांडुरंग पाटील यांनी ” सुंदर “हे उत्कृष्ट भात पिक मळा या ठिकाणी घेतले आहे. कंपनीच्या वतीने या त्यांच्या भात पिकाची दखल घेऊन त्यांच्या कष्टाला आणि कलागुणांना वाव मिळावा यासाठी कंपनीच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमात पुढे बोलताना सुरेश चौगले म्हणाले ” महिंद्रा कंपनी ही नावाजलेली कंपनी असून या कंपनीने भरघोस पिक देणारी बियाणे निर्माण केली आहेत. कंपनीची सुंदर, सौभाग्य, किरण, कल्पना, ३०३०, अशी बियाणे उत्पन्नाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेत.ही बियाणे शेतकऱ्यांनी भविष्य वापरावी असे आवाहन यावेळी सुरेश चौगले यांनी केले.
महिंद्रा कंपनीच्या वतीने अरविंद पाटील यांनी सुंदर या भाताचा उत्कृष्ट भात घेतल्याबद्दल त्यांचा फेटा घड्याळ,श्रीफळ, देऊन प्रगतशील शेतकरी बळवंत मोहिते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला महिंद्रा कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर सुरेश चौगले, अरविंद पांडुरंग पाटील,दत्तात्रय मारुती चौगले , उतम पाटील(गुडाळ), संभाजी आनंदा डवर, अनिल कृष्णा चौगले, रंगराव शंकर डवर, संभाजी गणपती चौगले, सौरभ बाजीराव चौगले, आयुष बळवंत चौगले, अक्षय जोहार, सौ.रंजना डवर,सौ.सुजाता डवर,सौ हौसाबाई चौगले, सौ.राधिका रानमाळे,सौ. छाया सुतार, आदी महिला व शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश चौगले यांनी केले. व आभार अमर पाटील यांनी मानले.