कोल्हापूरचा प्रसाद स्पोर्ट्स नामदार चषकाचा मानकरी; युनायटेड गडहिंग्लज उपविजेता; मुरगूड मधील फुटबॉल स्पर्धा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील नामदार चषक फुटबॉल स्पर्धेत सामना संपण्यास काहीच मिनीटाचा अवधी असताना अत्यंत चपळाईने गोल करीत कोल्हापूर च्या प्रसाद स्पोर्ट्स संघाने नामदार चषक पटकावला .तर अटीतटीची लढत देणाऱ्या गडहिंग्लजच्या युनायटेड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . कोल्हापूरच्या खंडोबा तालीम मंडळाचा तृतीय क्रमांक आला.
कोल्हापूरच्या प्रणव कणसे (प्रसाद ) या खेळाडूस उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रणजित सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत पुणे,सांगली,मिरज, कोल्हापूर, गडहिंग्लज, गारगोटी,बेळगाव आदी ठिकाणचे सोळा संघ सहभागी झाले होते.स्पर्धेत बेस्ट मिड फिल्डर -अनिकेत सुतार, बेस्ट गोलकीपर – ओंकार सुतार, बेस्ट फॉरवर्ड -वैभव राऊत,बेस्ट डिफेडर – रोहन दाभोळकर याना सन्मानित केले.
यावेळी प्रविणसिंह पाटील यांनी खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणारे वाढदिवस कौतुकास्पद असल्याचे सांगून कुस्ती, कब्बडी, व्हॉलीबॉल याबरोबरच फुटबॉलचे चाहते आणि खेळाडू मुरगूड शहर आणि परिसरात निर्माण होत आहेत .भविष्यात अशा मोठ्या स्पर्धा आयोजित कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कोजीमाशीचे चेअरमन बाळ डेळेकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, नगरसेवक रवी परीट, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील,भैय्या माने,दादासो लाड,डी डी.चौगले, शशीकांत खोत,मनोज फराकटे, विकास पाटील, बिद्रीचे संचालक जगदीश पाटील,दत्ता पाटील केनवडेकर, बी.एम.पाटील,किरण पाटील,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निलेश शिंदे,रंगराव पाटील,देवानंद पाटील,प्रकाश चौगले,शामराव घाटगे,अमित तोरसे, समाधान पोवार यांच्या हस्ते करण्यात आला.स्वागत प्रास्ताविक राजू आमते यांनी केले . निवेदक म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले . तर आभार सुनील चौगले यांनी मानले.