ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास यांची अंबाबाई मंदिरास भेट ; गुरुजींना पाहताच भक्तांनी केली अलोट गर्दी

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आंतरराष्ट्रीय किर्तीचे अध्यात्मिक गुरू गौर गोपाल दास कोल्हापूर दौऱ्यावर असताना आज यांनी आज अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आणि देवस्थान समितीच्या वतीने गुरुजींचा सत्कार करण्यात आला.गुरुजींना पाहताच भक्तांनी मोठी त्यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.यावेळी पत्रकारांना संदेश देताना सत्यमेव जयते चा मंत्र आचरणात आणण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे,राजेंद्र कोरे,धनंजय सराटे,प्रमोद कुरले,पूनम सुळगावकर,माधुरी जाधव आदी उपस्थित होते.