क्रीडाजागतिकताज्या बातम्याभारत
#KOLHAPUR_CRICKET : #IND_VS_PAK_T20 : कोल्हापूरकरांनो, घरातच थांबायला लागतंय…भारत-पाक हायहोल्टेज सामना उघड्यावर तसेच चौकात स्क्रीन लावून मॅच पाहू नये, अन्यथा…पुलिस आयेगी.
रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान टी -20 क्रिकेट सामान्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान सामन्याची अनेकांना उत्सुकता असते आणि त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोल्हापूर :
उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान टी -20 क्रिकेट सामान्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. भारत पाकिस्तान सामन्याची अनेकांना उत्सुकता असते आणि त्यामुळेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय सामना पाहण्यासाठी उघड्यावर अथवा चौकामध्ये स्क्रीन लावू नयेत, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिला आहे.
