कोल्हापूर : ‘कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून व्यापार, उद्योग व व्यवसाय चालू ठेवणार’ कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व संलग्न संघटनेचा एकमुखी निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनातर्फे दि. ०४ एप्रील २०२१ रोजी राज्याच्या मंत्रीमंडळाची मिटींग झाली. त्यानंतर आदरणीय मंत्री महोदय यांनी मिडीयावर दिलेल्या मुलाखतीमध्ये फक्त आठवड्यातील शनिवार व रविवार या दोन दिवसापुरता ‘विकेंड लॉक’ असेल असे सांगितले होते. परंतू महाराष्ट्र सरकारने DMU/2020/CR.92/DisM-1 या दि. ०४ एप्रिल २०२१ च्या परिपत्रकानुसार संपुर्ण राज्यामध्ये दि. ०५ एप्रिल २०२१ रात्री ८ वाजेपासून ते दि. ३० एप्रिल २०२१ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सोडून उर्वरीत सर्व व्यापारी आस्थापना यांना संचारबंदी लागू केलेली आहे.
यासंदर्भात दि. ०५ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटील, मा. नाम. हसन मुश्रीफ, मा. नाम. राजेंद्र पाटील- यड्रावकर तसेच मा. दौलत देसाई, जिल्हाधिकारी, मा. कादंबरी बलकवडे, आयुक्त, को.म.न.पा., मा. शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधिक्षक व सर्व संबधीत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटना यांच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली.
या भेटीमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटनांचे पदाधिकारी यांनी सदर परिपत्रकामधील ‘सर्व व्यापारी आस्थापना (अत्यावश्यक व जिवनावश्यक सेवा सोडून) बंद ठेवा,’ या निर्णयाचा कडाडून विरोध केला. ‘सर्व व्यापारी अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेत असाल तर तुम्हाला व्यापाऱ्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळणार नाही. कारण ‘कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी आस्थापना या *“माझे कुटूंब-माझी जबाबदारी”* या योजनेअतंर्गत शासनाने घालून दिलेले कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा कोरोना रुग्णामध्ये सर्वात शेवटी आहे.’ असे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले. जर ‘तुम्ही सर्व व्यापारी अस्थापना सुरू असताना कोणती कारवाई केली तर आम्ही अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवासुध्दा बंद ठेवू.’ असा इशारा सर्व सलंग्न संघटना यांच्यातर्फे मा. संजय शेटे यांनी प्रशासनाला दिला. यावर पालकमंत्री मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटील व मा. नाम. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व सर्व सलंग्न संघटना यांचेकडे एक दिवसाची मुदत मागून घेवून उद्या दि. ०६ एप्रिल २०२१ रोजी योग्य तो निर्णय देऊ असे अश्वासन दिले.
वरील भेटीसंदर्भात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या कार्यालयामध्ये सर्व सलंग्न संघटना तसेच, व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्यात येवून ‘महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नागरीक, व्यापारी आस्थापना कोरोना प्रतिबंधाचे नियम तंतोतंत पाळून आपली आस्थापने सुरु ठेवणार.’ असा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे व जयेश ओसवाल व राजू पाटील, माजी अध्यक्ष ललित गांधी, आनंद माने, प्रदीपभाई कापडीया यांनी उपस्थित व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संचालक प्रशांत शिंदे, अजित कोठारी, विज्ञानंद मुंढे, संपत पाटील, अनिल धडाम, संभाजी पोवार, सिमा शहा, सिमा जोशी, धर्मपाल जिरगे, अविनाश नासिपुडे तसेच सर्व सलंग्न संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक व व्यावसायीक उपस्थित होते.