बुक्किहाळ बुद्रुक येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित महिला स्व. गंगुबाई पाटील

चंदगड प्रतिनिधी :: पुंडलिक सुतार
बुक्किहाळ बुद्रुक येथील म. गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती गावडू पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई गावडू पाटील वय 86 वर्ष ,यांचे शनिवार दि.7 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 9 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांचा अल्प परीचय थोडक्यात,स्व. श्रीमती गंगुबाई पाटील यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता.सामाजिक व धार्मिक कार्यात त्या नेहमी सक्रिय सहभागी होत असत.त्यांच्या पश्चात मुले बाळेशी,मारुती पाटील(अध्यक्ष,म. गांधी तंटामुक्त समिती),सुना सौ.मलूबाई, सौ.रंजना,श्रीमती शांता, मुली सौ.मल्लवा गुंडू ढेकोळे, सौ.सुमित्रा यलापा बुक्कीहाळकर,सौ.सुवर्णा मनोहर येमेटकर,सौ.निलाबाई महादेव कुरी ,नातवंडे,जावई,असा परिवार आहे.दिवसकार्य शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहेत.
ऋणनिर्देश-
आमच्या मातोश्री श्रीमती गंगुबाई गावडू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.तालुक्यातील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज बांधव,भगिनी,नातेवाईक, पाहुणे मंडळी,मित्रपरिवार,सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ,हितचिंतक व ग्रामस्थांनी आमच्या दुःखात सामील होत आमच्या परिवाराचे सांत्वन करीत धीर दिला याबद्दल पाटील परिवार आपल्या सर्वांचे ऋणी आहे.