ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई , कोल्हापुरात 2 हजार पोलिसांचा कडक पहारा – पोलीस अधीक्षक बलकवडे

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
बुधवारी रात्री लागू झालेल्या संचारबंदिच्या च्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 2 हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोणाच्या वाढत्या प्रसारामुळे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला आहे. त्यासाठी 2 हजार पोलिसांचा फौजफाटा तयार करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक यशवंत बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यशवंतराव बलकवडे यांनी सांगितले आहे.