ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : इंदिरा सागर हॉल संभाजीनगर येथे रिक्षाचालक अनुदान नाव नोंदणी सुविधा अभियान सुरू

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने रिक्षा परवाना धारकांना रु.1500/- चे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान रिक्षा व्यावसायिकांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने थेट जमा करण्यात येणार आहे. ही मदत कोल्हापुरातील सर्व पात्र रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आज संभाजीनगर येथील इंदिरा सागर हॉल मध्ये तीन दिवसीय नोंदणी अभियान सुरू करण्यात आले.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटोरिक्षा वाहन क्रमांक, रिक्षाचे परमिट, आर.सी. बुक, लायसन्स, बँक पासबुक आणि आधार क्रमांक सोबत घेऊन संभाजीनगर येथील इदिरासागर हॉल येथे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यानंतर रिक्षा चालकांना शासनाकडून त्यांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा करण्यात येणार आहे.
यावेळी गृहराज्यमंत्री नामदार सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील,नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दुर्वास कदम, मधुकर रामाने, दिग्विजय मगदूम, दीपक थोरात, अभिजित देठे, पार्थ मुंडे, देवेंद्र सरनाईक, रोहित गाडीवडर, उदय पोवार, कुणाला पत्की, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, पूजा आरडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks