कोल्हापूर पोलिस : महिला कॉन्स्टेबलचा वर्दीला कलंक; 2 हजार रुपयांची लाच घेताना महिला पोलिस अॅन्टी करप्शनच्या जाळयात
कोल्हापूर :
2 हजार रूपयाची लाच घेताना महिला पोलिस कर्मचार्याला अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
काजल गणेश लोंढे (बक्कल नं. 217, नेमणूक – महिला सहाय्य कक्ष, पोलिस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर वर्ग-3, रा. बंगला नं. 10, पार्वती कन्ट्रक्शन, सरनोबतवाडी, पसरीचा नगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे लाच घेणार्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून त्यांचे पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष पो.अ. कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता सदर अर्ज निकाली काढला व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यांना देणेकामी काजल गणेश लोंढे यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारल्याने त्याना रंगेहात पकडण्यात आले.
पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर पोलिस अधीक्षक शितल जानवे , अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे , पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी , सहाय्यक उपनिरीक्षक प्रकाश भंडारे , पोलिस हवालदार अजय चव्हाण, विकास माने, पोलिस नाईक सचिन पाटील, महिला पोलिस नाईक संगीता गावडे आणि महिला पोलिस अंमलदार पुनम पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.