ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागल : शाहू कारखाना १६ जानेवारीनंतर गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार उशिरा ऊस गळीत अनुदान : अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांची माहिती

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला १६ जानेवारी २०२४ पासून उशिरा ऊस गळीत अनुदान देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली.यावेळी शाहूचे ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे,उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

कारखान्याच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार १६ जानेवारी ते ३१ जानेवारी प्रतिटन ५० रू ,१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी प्रतिटन १०० रु. १६ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी प्रतिटन १५० रु. व १ मार्चपासून पुढे गळीत हंगाम समाप्तीपर्यं प्रतिटन २०० रु. अशी रक्कम उशिरा ऊस गळीत अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला व नोंदविलेला संपुर्ण ऊस कारखान्यास पाठवून या अनुदानाचा लाभ घ्यावा.व ऊस गळीत उद्दिष्टपुर्तीस सहकार्य करावे.असे आवाहन श्रीमती घाटगे यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks