ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिका आरोग्य अधिकारी यांच्याकडून रेमडिसिवीरसाठी सनियंत्रण

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यातील रेमडिसिवीर या औषधाच्या restricted emergency use सनियंत्रणाकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून नगरपालिका क्षेत्र, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून ग्रामीण व महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
डॉ. साळे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात, राज्यात कोव्हिड -19 च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रेमडिसिवीर इंजेक्शनची मागणी सर्वत्र मोठ्याप्रमाणात वाढलेली आहे या औषधाचा उत्पादकाकडून पुरवठा होण्यावर मर्यादा आहेत. कोव्हिड रुग्णालये व सलग्न विक्रेते यांना व काही ठराविक विक्रेत्यांना या औषधाची विक्री केली जाते. त्या जिल्ह्यामध्ये या औषधाच्या उपलब्धतेबाबत विशेष तक्रारी प्राप्त नाहीत. मात्र काही जिल्ह्यामध्ये या औषधाची कोव्हिड रुग्णालये, रुग्णालयांशी सलग्न विक्रेते व इतर घाऊक व किरकोळ विक्रेते यांना सरार्स विक्री केली आहे अशा जिल्ह्यामध्ये रुग्णालये व रुग्णालयाच्या सलग्न विक्रेत्याकडे रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून या औषधास restricted emergency use साठी मान्यता दिलेली आहे. रेमडिसिवीर या औषधाची मागणी करताना रुग्णाचा कोव्हिड पॉझिटीव्ह चाचणी अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व रुग्णाचे आधार कार्ड इत्यादी जोडण्याबाबत सूचना उत्पादकाने रुग्णालये व औषध विक्रेते यांना दिल्या आहेत.
जिल्ह्याची परिस्थिती पाहता दि. 9 एप्रिल अखेर 1540 कोव्हिडचे रुग्ण ॲक्टीव्ह व पॉझिटीव्हीटी रेट 13.19 असा आहे. त्यामुळे दैनंदिन रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रेमडिसिवीर या औषधाचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या बातम्या प्राप्त होत आहेत.
रेमडिसिवीर या औषधाची विक्री ही जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने फक्त कोव्हिड रुग्णालये व कोव्हिड रुग्णालयाशी सलग्न औषध विक्रेते यांना करणे, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या दरानेच रेमडिसिवीर औषधाचे विक्री करणे, जिल्ह्यात रेमडिसिवीर इंजेक्शन इतर रुग्णालयात दाखल रुग्णांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिने अभ्यास करुन गरजेनुसार आवश्यक तिथे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने निश्चित करणे व त्यांच्या मार्फत औषधांचा पुरवठा करणे. जिल्ह्यातील रेमडिसिवीर या औषधाच्या restricted emergency use सनियंत्रणाकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून नगरपालिका क्षेत्र, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडुन ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्र आरोग्य अधिकारी महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. औषध इतर कोणत्याही विक्रेत्यांना कोरोना कालावधी संपेपर्यंत वितरण/ विक्री करण्यात येणार नाही. आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks