ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : गतवर्षाप्रमाणे यावर्षीही तयारी ठेवा-पालकमंत्री सतेज पाटील महापालिका, आयजीएम, सीपीआर आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज यंत्रणा कार्यान्वित करा

कोल्हापूर प्रतिनिधी – रोहन भिऊंगडे

मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेवून या वर्षीही कोरोना रुग्णांसाठी तयारी ठेवावी. महानगरपालिका, आय जी एम, सी पी आर आणि गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय यंत्रणा पूर्ण क्षमतेने उपचारासाठी कार्यान्वित करावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, महापालिकेने आपली यंत्रणा सक्रीय करुन मागील वर्षाप्रमाणे कोव्हीड आरोग्य केंद्र सुरु करावीत. हॉटेल चालकांशी चर्चा करुन या वर्षीही रुग्णांसाठी सुविधा देण्यासाठी तयारी करावी. फायर ऑडीटनुसार सीपीआर मध्ये तात्काळ दुरुस्ती करावी. कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी समन्वय ठेवून आपापली जबाबदारी पार पाडावी,असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, शासन निर्देशाप्रमाणे औद्योगिक आणि व्यापारी घटकांतील व्यक्तींची तपासणी करुन निगेटिव्ह अहवालानंतर त्यांचे लसीकरण केले जाईल. त्यासाठी संपर्क अधिकारी नेमण्यात येतील. तसेच रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनासाठी मनपा, नपा आणि ग्रामीण भागात तीन शिफ्टमध्ये संपर्क अधिकारी नेमण्यात येतील. ते रुग्णांचा प्रवेश आणि डिस्चार्ज याबाबत मॉनिटरींग करतील. तपासणी वाढवण्यावरही भर द्यावा. गृह अलगीकरणाबाबत तपासणी करुनही त्यावर मॉनिटरींग करावे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, उपायुक्त निखील मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, के एम ए च्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks