कोल्हापूर : फक्त ६ मिनिट चालायला लागतय ; अंतर्गत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची सोसायटींना भेटी

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. व्याधीग्रस्त नागरीकांची तपासणी करुन त्यांच्यामधील तात्काळ कोरोनाबाधीतांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्यावतीने संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच मृत्यूदर कमी होण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत आहे. याची व्यापकता वाढवून १८ वर्षावरील सर्वच नागरिकांची वॉक टेस्ट घेण्याला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे आणि उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत शहरात सोसायटींना भेट देऊन “चला कोल्हापूर… चालायला लागतंय फक्त सहा मिनिटे आपल्या आरोग्यासाठी” ही संकल्पना घेऊन हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाला सोसायटीमधील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. यावेळी 204 नागरीकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी असलेले 10 नागरीक आढळून आले.
या अभियानाच्या माध्यमातून आता १८ वर्षावरील सर्वच नागरिकांची सहा मिनिटे वॉक टेस्ट घेतली जात आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून सदरबाजार परिसरातील पेटोनिया अपार्टमेंट, न्यू शाहूपूरी, साईक्स एक्स्टेंशन, रंकाळा डी मार्ट मागील बाजूस असलेले हिराश्री लेक अपार्टमेंट, मीराभक्ती अपार्टमेंट याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांची वॉक टेस्ट घेतली. या वॉक टेस्टला नागरिकांनी स्वतःहून सहा मिनिटे चालून प्रतिसाद दिला. यावेळी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना या अभियानाला सहकार्य करावे असं आवाहन केलं. तर उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी कोल्हापूर शहरातील १८ वर्षावरील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन केलं.