ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : इचलकरंजीत जुगार अड्यावर छापा ; बारा जणांना अटक

इचलकरंजी प्रतिनिधी :
इचलकरंजी शहरातील षटकोण चौकातील बाळनगरमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापाटाकला. यामध्ये 12 जणाना अटक करीत, त्याच्याकडून 5 मोटारसायकल, 8 मोबाईल व 13 हजार 500 रूपयांच्या रोकडसह 2 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली. या कारवाईमध्ये कॉन्स्टेबल सुनील पाटील, सागर हारगुले, जावेद आंबेकारी, सदाम शेख आदींनी भाग घेतला.