ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : शिरोली दुमाला येथे घराला आग ! ५० हजारचे नुकसान

सावरवाडी प्रतिनिधी :
शिरोली दुमाला ( ता. करवीर ) होळी सणाच्या दिवशीच येथील राऊसो पाटील यांचे घराचे वरती वेल्डींग काम चालू होते. अचानक वेल्डींगची ठिणगी पडून आग लागली..जनावरांचा गोठा असलेने वरती वैरण भरली होती. त्यामुळे वैरणीने पेट घेतला. जनावरांना बाहेर काढल्याने मोठी जीवीतहानी टळली..ग्रामस्थांनी पाणी मारून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.