निपाणी-फोंडा राज्य मार्गाचे काम त्वरित करा …निढोरीचे सरपंच अमित पाटील यांची सार्वजनिक बांधकाम विभागकडे निवेदनाद्वारे मागणी…अन्यथा आंदोलन

मुरगुड प्रतिनिधी :
निपाणी-फोंडा राज्य मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.हे काम त्वरित पूर्ण करा ,
अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा निढोरीचे सरपंच अमित पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे निवेदनाद्वारे दिला.
निपाणी-फोंडा राज्य मार्गाचे काम गेली ३ वर्ष कंत्राटदार जितेंद्रसिंह इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांचेकडून कासवगतीने सुरु आहे. यापैकी निढोरी ते मुदाळ तिट्टा या मार्गावरील रस्ता पूर्णपणे उकडलेला आहे.या रस्त्यावरून संत बाळूमामा देवालयासाठी लाखो भाविक , गोवा , कर्नाटक , कागल राज्यमार्गावरून ये जा करत असतात. तसेच सध्या पाच ऊस कारखान्यांची वाहनाचे वाहतुक अशाप्रकारे दररोज हजारो अवजड वहाने या रस्त्यावरून ये-जा करतात. या मार्गावर निढोरी गाव असलेमुळे वाहनाच्या धुळीमुळे ग्रामस्थ श्वसनाच्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. तसेच उभ्या पिकाचे धुळीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. या मार्गावरील नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक वाहनांचे अपघात होऊन पादचारी व वाहनधारक गंभीररित्या जखमी होत आहेत तर अनेकांचा बळी गेला आहे. सध्या या रस्त्याचे काम पुर्णपणे थांबले आहे.ते सुरु करण्याबाबत कोणतेही हालचाल दिसत नाही.
सदर काम तातडीने सुरु न झालेस आम्हास आंदोलनचे हत्यार उपसावे लागेल.असा इशारा निढोरीचे सरपंच अमित पाटील यांनी दिला.
यावेळी कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, डे.इंजी अमित पाटील, मा.डे.सरपंच अमोल पाटील, ग्रा.पं सदस्य बाजीराव चौगले, विकास पाटील,संजय पाटील, सुभाष जाधव हे उपस्थित होते.