ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र

कोल्हापूर : गारगोटी :: नव वधू-वर सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं पाहण्यात मशगुल असतानाच काळाने डाव साधला; साईनाथ मोरे याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू.

गारगोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सर्जेराव मोरे यांचा साईनाथ हा मुलगा आहे.

गारगोटी प्रतिनिधी :

विवाह ठरला, मंडप सजला, हळद लागली आणि विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला, आणि नवं वधू वर सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्नं पाहण्यात मशगुल असतानाच काळाने डाव साधला. मोठ्या आनंदाने लावलेली हळद सुद्धा अजून निघाली नसेल अगदी लग्नानंतर पंधरवड्यातच जुळलेली जोडी तुटली, एका अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला, गारगोटीत मनाला चटका लावणारी घटना घडली,आणि सारा भुदरगड तालुका सुन्न झाला, साईनाथ सर्जेराव मोरे (वय वर्षे २४ रा. गारगोटी) असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव आहे,गारगोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सर्जेराव मोरे यांचा साईनाथ हा मुलगा आहे.

मयत साईनाथ हा सावंतवाडी येथे बी फार्मसी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. काही कामासाठी तो सावंतवाडी येथे कॉलेजमध्ये गेला होता आणि दोन दिवसांपूर्वी तो कणकवलीमार्गे गारगोटीकडे येत असताना त्याच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झालेने त्याला प्रथम कणकवली येथे त्यानंतर ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथेही उपचारास प्रतिसाद देत नसलेने त्याला कोल्हापूर येथील खाजगी इस्पितळात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज रविवारी दुपारी १२ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
साईनाथचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी झाले.

मयत साईनाथचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात झाले होते. गारगोटी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सर्जेराव मोरे यांचाहा मुलगा असून साईनाथ प्रसिद्ध कुस्तीपटू होता. मनाला चटका लावणाऱ्या त्याच्या अशा अपघाती जाण्याने गारगोटी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks