ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : ऑक्सिजन वितरण व नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

जिल्ह्यात कोव्हिड 19 साथ रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोव्हिड रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी तसेच ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून होणारे वितरण व पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
कोविड-19 रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या काही दिवसात मेडिकल ऑक्सिजनची गरज अनेक पटींनी वाढण्याची दाट शक्यता आहे. वैद्यकिय ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गंभिर कोविड-19 रुग्णांच्या उपचारावर परिणाम होवू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या आस्थापनांतून होणारे वितरण व पुरवठा नियंत्रित करणेचा निर्णय घेतलेला आहे.
कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सीजन उपलब्ध करुन देणे अत्यंत आवश्यक असलेने कोल्हापूर जिल्हयातील ऑक्सीजन उत्पादन, पुरवठा, वाहतूक, ऑक्सिजनचा प्रोटोकॉल नुसार योग्य वापर करुन ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी समिती मार्फत कामकाज केले जाणार आहे.
अ.क्र. अधिकारी यांचे नांवे, हुद्दा व मोबाईल क्रमांक समितीतील पद नेमणेत आलेले काम
1) श्री. भाऊ गलंडे, निवासी उपजिल्हाधिकारी
मोबा- 9689993035 अध्यक्ष सर्व कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन करणे.
2) श्रीमती सपना कुपेकर, प्र. सहा. आयुक्त, औषध, कोल्हापूर, मोबा – 9870550144
श्री. मोहन केंबळकर, सहा. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर मोबा -7020636372 सदस्य जिल्हा व जिल्ह्याबाहेरील उत्पादकांशी समन्वय व आवश्यकतेप्रामणे उपलब्धता ठेवणेचे नियोजन.
3) श्री. धनाजी इंगळे,
प्रादेशिक अधिकारी, मऔविम, कोल्हापूर
मोबा – 9923222381 सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील सर्व पुरवठादार / उत्पादक यांचेवर नियंत्रण व सर्व शासकीय रुग्णालयांना पुरवठा करणे.
श्री. सतिश शेळके, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर मोबा – 9423839512 सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील सर्व पुरवठादार / उत्पादक यांचेवर नियंत्रण व सर्व शासकीय रुग्णालयांना पुरवठा करणे.
4) श्री. स्टीव्हन अल्वारीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर मोबा – 8108639933 सदस्य वाहतूक – टँकर समन्वय – विनाअडथळा ऑक्सिजन पुरवठा ठेवणे. तसेच टँकरची उपलब्धता व रुट ॲलॉट करणे.
5) डॉ. हर्षला वेदक, निवासी वैद्यकीय अधिकारी बाहयसंपर्क, सीपीआर, कोल्हापूर
मोबा – 9423039869 सदस्य कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खाजगी रुग्णालयां मधील मागणी नोंदविणे व पुरवठा सुरळीत ठेवणे.
6) डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर मोबा – 7719986661 सदस्य ग्रामीण क्षेत्रातील सर्व CCC, DCHC व DCH मधील मागणी नोंदविणे व पुरवठा सुरळीत ठेवणे.
7) डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्य अधिकारी,
कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
मोबा – 8007714528 सदस्य महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी, महानगरपालिकेच्या व शासकीय (CPR) रुग्णालयांतील मागणी नोंदवणे व पुरवठा सुरळीत ठेवणे.
या समितीने दैनंदिन ऑक्सिजनची गरज व ती पुरविणाऱ्या Bottling Plants, Bulk Suppliers यांचे सतत संपर्कात राहून प्रत्येक शासकीय व खाजगी रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
ऑक्सिजन उत्पादन व साठा करणाऱ्या आस्थापना व त्यावर सनियंत्रण करणेसाठी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील CCC, DCHC व DCH या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण व समन्वय करणेसाठी समन्वय अधिकारी व सहाय्यक तालुका नियंत्रण अधिकारी यांचे कामकाज कायम राहील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks