ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये आले बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल, शहरात सर्वत्र खळबळ

कोल्हापूर प्रतिनिधी :

कुरुंदवाड येथे शिवसेना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे यांच्या नावाने बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आले होते. बॉम्ब शोध पथकाने या बॉम्ब सदृश्य वस्तूंची पाहणी करून ते निकामी केले. बॉम्ब असल्याची वार्ता शहरात पसरताच खळबळ उडाली होती.

दरम्यान, पोलिसांनी गांभीर्य ओळखून ही वस्तू तबक उद्यान येथे मैदानात अलगद आणून ठेवली आणि बॉम्ब शोध पथकाने प्रक्रिया करून ती वस्तू निकामी केली. तर त्यात साधे घड्याळ व फटाक्यांची दारू आणि काही वायरींचे सर्किट आढळून आले. दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आली होती. पण पुन्हा तालुक्यातच कुरुंदवाड येथे ही वस्तू पार्सलच्या माध्यमातून शहरात आल्याने नागरिकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

कुरुंदवाड येथील महाडिक हॉटेल येथे शिरोळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख वैभव गुगळे यांच्या नावाने सांगली येथून रिक्षातून एका 70 वर्षीय वृद्ध माणसाने फुलांचा बुके व एक कागदी बॉक्स दिला. दरम्यान महाडिक हॉटेलच्या मालकाने तालुकाप्रमुख उगळे यांना आपले पार्सल आले आहे असे सांगितले असता त्यांनी पार्सल उघडून पहा असे सांगितले. पार्सल उघडून पाहिले असता बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आल्याने भयभीत झालेल्या हॉटेल मालकाने तालुकाप्रमुख उगळे यांना सदरची माहिती सांगितली. उगळे यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरची वस्तू अलगद उचलत तबक उद्यानच्या मैदानात आणून ठेवली. पार्सल घेऊन आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.

बॉम्ब शोध पथक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मानसिंग पाटील, विनायक लाड, आशिष मिठारे, रवींद्र पाटील, ओंकार पाटील, जयंत पाटील, विनायक डोंगरे, मुस्तक शेख यांनी पार्सल वस्तूची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने सामग्री लावून सदरची वस्तू निकामी केली. सिम्बॉ या डॉगद्वारे तपासणी केली. या निकामी झालेल्या पार्सलमध्ये असणारे साहित्य तपासणीसाठी बॉम्ब शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सदरची वस्तूही बॉम्ब सदृश्य होती. मात्र बॉम्ब नव्हता असे सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, संजय राठोड आदी उपस्थित होते.

दरम्यान, बॉम्ब सदृश्य वस्तू आल्याची वार्ता पसरताच नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks