ताज्या बातम्यामहाराष्ट्र
KDCC BANK ELECTION : मुश्रीफ-कोरे मैत्रीचा सिलसिला कायम राहणार?; निकालानंतर आता अध्यक्ष निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष.
सत्तारूढ गटाचे पॅनेल ठरवताना कोरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या आग्रहाखातर प्रक्रिया गटातून प्रदीप पाटील-भुयेकर व पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली.

NIKAL WEB TEAM :
दुसरीकडे काँग्रेसचे पाच, अमल महाडिक यांच्यासह कोरे यांचे तीन, विरोधी पॅनेलमधून शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. कोरे विरोधात गेल्यास ही संख्याही ११ वर जाते. पण, कोरे हे सद्यस्थितीत कोणासोबत जातील, हे निश्चित नाही. सत्तारूढ गटाचे पॅनेल ठरवताना कोरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या आग्रहाखातर प्रक्रिया गटातून प्रदीप पाटील-भुयेकर व पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली. पण, या दोघांचाही पराभव झाला. सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी विश्वासघात करून सुरूंग लावल्याचा आरोप या दोघांच्या पराभावानंतर व्यक्त करून कोरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ही नाराजी कायम राहणार की मुश्रीफ-कोरे यांच्यातील मैत्रीचा सिलसिला जिंकणार यावरही अध्यक्ष पदाचे गणित अवलंबून आहे.