ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर :दिंडनेर्ली येथील युवराज पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

नंदगाव वार्ताहर :
विद्यापीठ अनुदान आयोग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत दिंडनेर्ली (ता.करवीर)येथील युवराज रघुनाथ पाटील उत्तीर्ण झाले.
डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत युवराज पाटील यांनी राज्यशास्त्र या विषयातून सेट परीक्षा दिली होती.युवराज पाटील हे सध्या विद्या मंदिर येवती(ता.करवीर)या प्राथमिक शाळेत अध्यापक म्हणून कार्यरत आहे.त्यांना गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव,शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार व मुख्याध्यापक संजय कुर्डूकर यांचे मार्गदर्शन लाभले.