ताज्या बातम्या

करवीर तालुक्यात सुर्यफुल काढणीस वेग

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :

करवीर तालुक्यात  जानेवारी माहिन्यातील उन्हाळी  हंगामाकरिता पेरणी केलेल्या सुर्यफूल या तेल बीयां पीकांच्या काढणीस वेग आला आहे . ऐन लॉकडाऊन काळात शेतीमध्ये सुर्यफूल काढणीसाठी बळीराजाची धांदल उडाली आहे .

               यंदाच्या हंगामास सुर्यफलास उत्तम हवामान लाभल्याने सुर्यफूल पिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे . या वर्षी विविध सुधारित सुर्यफूल बीयांणाचा शेतकऱ्यानी पेरणी केली . शेतीमध्ये खोडवा  ऊस पीक क्षेत्र व मोकळ्या जमिनीमध्ये सुर्यफूलांची लागवड करण्यात आली होती . 

              बाजारपेठेत गोड्या तेलाचे भाव प्रचंड स्वरूपात वाढू लागल्याने ग्रामीण भागात सुर्यफूल , भुईमुग , या पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks