ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पुढच्या वर्षी लवकर या ! मुरगुडसह शिंदेवाडी परिसरात बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड व शिंदेवाडी गणेश भक्तांना येथील सर पिराजीराव तलाव ,तेलवडा ,कुरणी बंधारा, गावभागातील दत्त मंदिर ,कृत्रिम तलाव या ठिकाणी श्रीगणेश विसर्जनाची व गौरीचे निर्माल्याची व्यवस्था मुरगुड नगरपालिका तसेच शिंदेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती. आज पाच दिवसांच्या गौरी आणि गणपतीला अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
मुरगुड ,शिंदेवाडी परिसरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात टाळ-मृदृगांच्या सुरात लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीभावाने आणि जड अंत: करणाने निरोप दिला गेला . पाच दिवसांचा पाहुणचार घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पा निघाले . तसेच विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी मुरगुड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.