करंजिवणेत संचारबंदी कडक – स्वराज्य रेस्क्यू फोर्स चे जवान तैनात..

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्यासाठी भारत शासनाच्या संचारबंदी आदेशाच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्यातील करंजिवणे येथे खडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुरगुड पोलीस ठाण्याच्या सूचनांचे पालन करीत येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने स्वराज्य रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांच्या योगदानातून कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध करण्याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व उपाय याबाबत प्रबोधन केले जात आहे. आरोग्य स्वयंसेवक -स्वयंसेविका स्वच्छता व आहार -विहार याबाबत माहीती देवून विलगीकरणाचे महत्व समजावून देत आहेत. ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी, स्थानिक कोरोना प्रतिबंध ग्राम समिती यांचे सहकार्य लाभत आहे. सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे, स्वराज्य रेस्क्यू फोर्सचे संस्थापक दत्तात्रय वारके , सरपंच दगडू शेटके, पोलीस पाटील सौ.सवित पोवार हे पारिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर उपसरपंच वंदना पोवार ग्रा.प .सदस्य उत्तम बैलकर,योगिता लाड, साक्षी टेंबुगडे ग्रामसेवक एस.एम. शिंदे, तलाटी चौत्राली पुजारी,आरोग्य स्वयंसेवीका सुषमा म्हसवेकर, सरीता लाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी हे वेळोवेळी प्राप्त अहवाल नोंदीनुसार संबधित विभागाला अपडेट्स देत आहेत.