ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापशी : ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन महिला ठार ; तर १० जण जखमी

मुरगूड प्रतिनिधी :

काळम्मा बेलेवाडी ते वडगाव (ता.कागल) येथे ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन उसतोड कामगार महिला जागीच ठार झाली तर १० उसतोड कामगार जखमी झाले. ट्रॅक्टर चालक अण्णासो महादेव गळतगे (रा.शहापूरवाडी, ता.चिक्कोडी) हा ट्रॅक्टर जागीच सोडून फरार आहे. सदर घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात नागदत्त पुरभाजे खांडेकर (रा.इळेगाव, ता.गंगाखेड, परभणी) यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, ट्रॅक्टर ट्रॉली क्र.एम.एच०९-ए.एल. ७३०२ हा काळम्मा बेलेवाडी ते वडगाव (ता.कागल) रोडवर वडगावच्या हद्दीतील ओढ्याजवळ आला असता ट्रॅक्टर चालक अण्णासो गळतगे याने हलगर्जीपणाने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवला त्यामुळे त्याचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून दोन ट्रॉल्या पलटल्या यात उसतोड कामगार सौ.रुक्मिणी दिगंबर खांडेकर (वय २४, रा.इळेगाव, ता.गंगाखेड, परभणी) या जागीच ठार झाल्या तर १० उसतोड कामगार जखमी झाले. हे पाहताच ट्रॅक्टर चालक अण्णासो गळतगे हा ट्रॅक्टर जागीच सोडून फरार झाला. जखमींची नावे अशी : नागदत्त पुरभाजे खांडेकर, रत्नमाला नागदत्त खांडेकर, दिगंबर पुरभाजे खांडेकर (रा.इळेगाव, ता.गंगाखेड, परभणी), गयाबाई देवदास आवळे, देवदास कोंडीबा आवळे (रा. लाडझरी, बीड), राधाबाई वाल्मिकी देवकत्ते (रा.वंदन, परभणी), हेमा धनंजय जाहीर, धनंजय हनमंत जाहीर (रा. डोंगरपिंगळ, परभणी), मछीद्र लक्ष्मण गुळगे, सौ. मनीषा औदुम्बर खांडेकर. अधिक तपास पो.स.ई किशोरकुमार खाडे करीत आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks