ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापशी कोरोना केंद्रात अवतरली पंढरी; अवघा रंग एक झाला!

सेनापती कापशी :

शशिकांत खोत यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कापशी कोरोणा काळजी केंद्रात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामुळे वातावरण भक्तीमय बनले सेंटरमध्ये जणूकाही पंढरीचा अवतरल्याचे दिसत होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने कालपासूनच सोहळ्याची तयारी करण्यात कोरोणा रुग्ण व्यस्त होते रुग्णांनी फुलांच्या माळा बनवल्या सर्व सेंटर फुलांच्या माळांनी सजवण्यात आले. विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.कोरोणा सेंटरच्या मैदानावर विठ्ठलाची भव्य प्रतिमा उभी करण्यात आली . यावेळी कापशी येथील सर्व वारकरी व भाविक मंडळी पायी दिंडी घेऊन कोरोणा सेंटरवर दाखल झाले यावेळी शिल्पाताई खोत व शशिकांत खोत यांच्या हस्ते हार घालून दिंडीचे स्वागत करण्यात आले करण्यात आले.

दिंडी सेंटरवर पोहोचल्यावर गोल रिंगण सोहळा पार पडला. वारकरी देहभान विसरून पांडुरंगाच्या भक्तीत दंग झाल्याचे चित्र दिसत होते यावेळी सर्व स्त्री व पुरुष रुग्णांनीदेखिल भजनाच्या तालावर फुगड्यांचा फेर धरला.भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ पुस्तक व श्रीफळ देऊन शशिकांत खोत यांचा सत्कार करण्यात आला.सर्व रुग्णांना हरिपाठ पुस्तकाचे वाटप करण्यात आले. सेंटरवरील डॉक्टर व स्टाफ देखिल या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाला. या आनंदात सहभागी होऊन त्यांनी आपले दररोजचे कामकाज देखिल पाहिले. या सर्व वातावरणामुळे कोरोणा सेंटरवर जणूकाही पंढरीचा अवतरल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी या सेंटरचे प्रमुख शशिकांत खोत यांनी बोलताना सांगितले की , कोरोना मुळे सर्व सणांवर निर्बंध आले आहेत आषाढी एकादशी सारख्या दिवशीदेखील आपल्या भावना मनात दाबून ठेव्याया लागत आहेत म्हणूनच आम्ही कोरूना नियमांचे पालन करीत सेंटरवर आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्याचे ठरवले या साठी सर्व रुग्ण स्वयंसेवक व सर्व वारकऱ्यांनी सहकार्य केले त्यामुळे कोरोणा सेंटरवर प्रति पंढरपूर अवतरल्याचे पाहायला मिळाले, यातून आपल्याला आत्मिक समाधान मिळाल्याचे ते सांगायला विसरले नाहीत.

हा सोहळा पूर्ण करण्यामध्ये शशिकांत खोत, सुनिल चौगुले, शिवलिंग गुरव सर, संजय नाईक, साताप्पा बेलवाडकर, सुरेश काळेबेरे, विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी भक्त मंडळ, विठ्ठल रखुमाई पायी दिंडी भक्त मंडळ आदि लोकांनी सहकार्य केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks