कामगार दिनानिमित्त ‘आप’तर्फे आरोग्य सेवकांना चिक्की व मास्क वाटप

रोहन भिऊंगडे /
कोल्हापुर, :-
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने कोविड काळात स्वताची जिवाची पर्वा न करता महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सेवा बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना तसेच कर्मचाऱ्यांना चिक्की व मास्क वाटप करुन कृतज्ञता व्यक्त केली. शहरातील सर्वच 11 लसीकरण केंद्रांना भेटी देऊन चिक्की व मास्क वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात राजारामपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. 3 येथून करण्यात आली. यावेळी सर्वच आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत आमच्या कामाची दखल घेत अशा पध्दतीने व्यक्त केलेल्या कृतज्ञते बद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, आदम शेख, अभिजित भोसले, विशाल वठारे, प्रथमेश सूर्यवंशी, दत्तात्रय काटकर, राज कोरगावकर, संतोष चळवंडी, विजय हेगडे, बाबुराव बाजारी, सचिन ढापळे, चेतन चौगुले, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.