राज्यात पुढील 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. अशातच महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं आहे. पंरतु अद्याप म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहेत. अशातच आता हवामान विभागाने 23 जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
येत्या 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.
त्यानुसार आज हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामध्ये भारतात येत्या 4 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या 23 जूनपासून मध्य भारत व महाराष्ट्रात मान्सून बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान यंदा मान्सून उशिराने येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र 11 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली असली तरी पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत राजा चिंतेत आहे. मात्र आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस बरसला तर शेतकरी वर्गाला याचा चांगलाच फायदा होईल.