कागणीत लोकवर्गणीतून उभारली व्यायामशाळा

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कागनी तालुका चंदगड येथे लोकवर्गणीतून व्यायामशाळा उभारली असून यासाठी भारतीय सैन्य दलातील निवृत्त हवालदार व सध्या चंदगड पोलीस ठाणेकडे कार्यरत असलेले पो कॉ आनंद देसाई यांनी पुढाकार घेऊन तरुण,उद्योगपती,नोकरदार याना एकत्र करून लोक वर्गणीतून सहा लाखांची व्यायामशाळा उभारली आहे महाराष्ट्र कुस्ती पैलवान विष्णू जोशीलकर व कोल्हापूरचे सेवानी पो नि कृष्णा देसाई यांचे हस्ते उदघाटन झाले
यावेळी उद्योजक दिनेश देसाई,अनिल भोगण,जोतिबा बाचुळकर,प्रा अशोक बाचुळकर,महादेव जांभळे,महादेव मुरकुटे,जया खानापुरे,आण्णा बाचुळकर,विष्णू बाचूळकर व मान्यवर उपस्थित होते कागनी व नेसरी परिसरातील गवंडीनी श्रमदान केले तर इलेक्ट्रिक चे काम मोहन पाटील,पत्रे काम जोतिबा देसाइ,रंगकाम मदत शिवाजी कांबळे यांनी केली आमची मुंबई मंडळाने 55 हजार,आजी माजी सैनिक 1 लाख तर ग्रा पं ने 60 हजार रुपयांची मदत केली यासाठी आनंद देसाई,विनोद कुदनूरकर ,संदीप तारीहाळकर,कृष्णा सुलेभावीकर,शंकर पुजारी,गोवर्धन पुजारी,कपिल देसाई यांनी परिश्रम घेतले