ताज्या बातम्यासामाजिक
कागल पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपत निराधार व मजूर कुटुंबाना केले धान्याचे वाटप

सिध्दनेर्ली प्रतिनिधी : शिवाजी पाटील
कागल पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपत निराधार व मजूर कुटुंबाना धान्याचे वाटप करून आधार दिला.
याबाबत अधिक माहिती अशी कागल पोलिस ठाणे हद्दीत राहणारे कर्नाटक राज्यातील लॉकडाऊन काळात अडकलेले सत्तर कुटुंबीय हे सध्या लोकडाऊन असल्याने काही काम धंदा नसल्याने सदर कुटुंब यांना अन्नधान्य कमतरता असल्याचे समजल्याने आज सपोनि वाघचौरे व पोलीस अमंलदार असे वाघजाई घाट डोंगरात राहणारे मजूर व त्यांच्या कुटुंबियांना पाच किलो तांदूळ पाच किलो गहू एक लिटर तेल तसेच एक किलो साखर असे कीट वाटप करण्यात आले तसेच केनवडे, सिद्धनेर्ली येथील निराधार व वयोवृद्ध महिला यांनाही सदर किट वाटप केले.
यापुढे कागल पोलिस ठाणे हद्दीतील गरजू व वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक यांना सदर साहित्य किट वाटप करण्यात येणार असलेची माहीतीही त्यांनी दिली.