ताज्या बातम्या

जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना शुभेच्छा : डॅा.माधुरी खोत

महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांनी अनेक यशाची शिखरे गाठत आपणही कुठे कमी नाही हे साऱ्या जगाला दाखवून दिले आहे. घर-संसार, नोकरी-व्यवसाय असो अथवा सामाजिक कार्य म्हणून कारकीर्द .. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. समोर उभ्या ठाकणाऱ्या अनंत अडचणींवर मात करत त्यातून महिलांनी नेहमीच जिद्दीने मार्ग काढला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आम्ही महिलांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. म्हणूनच महिला असल्याचा सार्थ अभिमान मला आहे . दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दीन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते. प्रत्येक ‘ती’चं आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे-खास आहे, ‘ती’नं केलेल्या प्रत्येक कार्याचा आम्हाला आदर आहे; अशा बऱ्याच गोष्टींची जाणीव ‘ती’चा सन्मान करून दिली जाते. तुम्हाला प्रत्यक्षात भेटून तुमच्या आयुष्यातील महिलांप्रति आदर व्यक्त करणं शक्य नसल्यास त्यांना मेसेजद्वारे छानसा संदेश पाठवा असे मार्गदर्शन *BA.MSW,DCS,BHMS *सदृढ महिला बाल आरोग्याच्या प्रणेत्या ,सामाजिक कार्यकर्त्यां, महिला संरक्षण स्वावलंबन व सक्षमीकरण अध्यक्षा, अनंतशाती बह्हुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे अध्यक्षा डॅा. माधुरी राजेंद्र खोत यांनी केले आहे.
माधुरी खोत यांनी महालक्ष्मी महिला प्रशिक्षण केद्र निगवे या संस्थेच्या माध्यमातून महिलाव बालकासाठि साठि ५००हुन आधीक आरोग्य शिबिरे ,प्रशिक्षण क्रेद्राअतर्गत २००हुन आधिक महिला ना मोफत प्रशिक्षण देवुन स्वावलंबी बणवण्यात आले तसेच महिलाच्या कतृत्वाच्या कार्याचा गैारव म्हणून 200 हुन आधिक महिलांना पुरस्काराचे वितरण व कोविड काळात वाडी वस्ती तील लोकांसाठि 60 हून आधिक उपक्रम राबविले आहेत. शिवाय महिला सकक्षमिकरणासाठि व स्वावलबनासाठी ,स्त्री भृण हत्या या विषयावर 50 हुण आधीक व्याख्याने, किशोर वयीन मुलि गरोदर माता स्तनदा माता यांच्यासाठी विशेष शिबीरे घेतली आहेत. त्यांच्या या समाजकार्याची दखल घेवून त्यांना भारत सरकार व्दारा नेहरु युवा पुरस्कार , महाराष्ट्र शासनाचा छञपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार , भगिणी मंचचा भगिनी गौरव पुरस्कार ,तुफान क्रांती चा कोविड योध्दा पुरस्काराने गैारविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks